PM Narendra Modi On Sharad Pawar | पंतप्रधान मोदींचा ठाकरे-पवारांवर घणाघात, नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की होणार

0

दिंडोरी : PM Narendra Modi On Sharad Pawar | उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) नकली शिवसेना आणि शरद पवारांची नकली राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार हे नक्की आहे. नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल तेव्हा मला सर्वात जास्त आठवण येईल ती बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray). बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ज्यादिवशी शिवसेनेची काँग्रेस होताना दिसेल तेव्हा मी माझे दुकान बंद करेन, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर घणाघात केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आता नकली शिवसेनेचे अस्तित्त्व संपणार आहे. नकली शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंची स्वप्न धुळीला मिळवली. बाळासाहेबांना वाटायचे अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जावे, कलम ३७० मागे घेतले जावे. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले, मात्र आत्ताच्या नकली शिवसेनेला या सगळ्याचा राग येतो आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसला विरोधी पक्षातही बसता येणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातले एक नेते आहेत, त्यांनी असा दावा केला आहे की निवडणूक संपल्यावर काँग्रेस पक्षात लहान पक्ष विलीन होतील. कारण त्यांना वाटते की सगळी दुकाने सुरु आहेत ती एकत्र आली तर काँग्रेस विरोधी पक्षात बसू शकतो. ही यांची अवस्था आहे.

मोदी म्हणाले, काँग्रेसने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार घातला. त्यांच्या पाठोपाठ नकली शिवसेनाही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकले. काँग्रेसचे लोक मंदिराबाबत काहीही बोलत आहेत. नकली शिवसेना एकदम गप्प आहे. दोन्ही पक्ष पापांचे भागिदार आहेत. महाराष्ट्राला नकली शिवसेना काय आहे ते कळले आहे.

पंतप्रधान मोदी ठाकरेंवर टीकास्त्र सोडताना म्हणाले, हे नकली शिवसेनेचे लोक काँग्रेसला डोक्यावर घेऊन नाचत आहे, जो काँग्रेस पक्ष दिवसरात्र फक्त वीर सावरकरांची निंदा करतो, महाराष्ट्राची स्वाभिमानी आणि राष्ट्रभक्त जनता हे पाहते तेव्हा त्यांच्या मनातला राग खूप वाढतो.

ते पुढे म्हणाले, नकली शिवसेनेत अहंकार आला आहे. महाराष्ट्राला काय वाटते आहे याचे काही देणेघेणे त्यांना नसून नकली शिवसेनेने काँग्रेसपुढे गुडघे टेकले आहेत. या शिवसेनेला धडा शिकवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतला आहे. तसेच यांना चारी मुंड्या चीत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.