Pravin Tarde-Murlidhar Mohol | परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच…, मित्र मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रवीण तरडेंनी गाजवली सभा

0

पुणे : – Pravin Tarde-Murlidhar Mohol | सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सर्वच पक्षाचे दिग्गज नेत्यांच्या सभा गाजत असताना काल पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha) उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा (Raj Thackeray Sabha In Pune) झाली. कालची पुण्यातील राज ठाकरेंची सभा मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक तसेच भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा मित्र प्रवीण तरडे यांनी गाजवली.

प्रवीण तरडे म्हणाले, नेमकी ही धडधड माझ्याच वाट्याला आली. ज्यांच्या वाणीवर सरस्वतीचं वरदान आहे, त्या माणसासमोर बोलावं लागतंय. मी माझ्या मित्रासाठी इथं आलोय. मुरलीधर मोहोळ माझा मित्र आहे. आमच्या दोस्तीचा पॅटर्न सर्वत्र दूरवर पोहोचवायचा आहे. सालस, सज्जन आणि सुशिक्षित नेतृत्व आपल्याला मिळतंय. माझ्या चित्रपटातील एक डायलॉग घेऊन मी बोलेन ‘दोन-दोन वर्ष पाऊस नाही पडला स्वराज्यात, तरी थंडीच्या दवावर ज्वारी, बाजरी काढणारी जात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट’ हा डायलॉग बोलायची गरज आता या व्यासपीठावर यासाठी पडली आहे. कारण कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय पण पुण्याचा रंग इतक्या सहजासहजी बदलू शकत नाही कारण इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापजाद्याने या स्वराज्यासाठी या पुण्यात रक्त सांडलंय.

मुरलीधर मोहोळचा मित्र आणि मुळशीचा सुपूत्र म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की, पुढील काही वर्ष आपल्याला खंबीर नेतृत्व देईल असं नेतृत्व आपल्याला या निवडणुकीत मिळालेलं आहे. सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करा. मुळशीतल्या मावळ्यांनी मोदींना दिल्लीला पाठवण्याचं ठरवलं आहे. हाच मुळशीचा प्रामाणिकपणा आपल्याला सर्वदूर आहे, असं प्रवीण तरडे यांनी भाषणात सांगितलं. यावेळी प्रवीण तरडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक उदाहरण दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.