Ajit Pawar On Sharad Pawar | शरद पवारांच्या राजकारणावर अजितदादांची टीका, म्हणाले…

0

पुणे : Ajit Pawar On Sharad Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) सध्या पवार विरूद्ध पवार सामना जोरदार रंगला आहे. रोजच्या रोज आरोप-प्रत्यारोप, आणि दोन्ही बाजूकडून एकमेकांवर टीका सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध अजित पवार असा कलगीतुरा सतत होत आहे. आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकारणावर टीका केली आहे. शरद पवार करतात स्ट्रॅटेजी, आम्ही केली की गद्दारी का? असा सवाल त्यांनी केला आहे.

प्रचार सभेत अजित पवार म्हणाले, १९७८ मध्ये वसंतदादांसोबत काय घडले त्याबाबत संजयभैय्या बोलले आहेत. वसंतदादा शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते होते. त्यांच्या नेतृत्वात सरकारचे कामकाज सुरू होते. मात्र ते सरकार पाडले गेले. मग जनता पक्षाला घेऊन सरकार स्थापन केले. त्यावेळी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाणांचे ऐकले नाही. ज्यांनी संधी दिली त्यांचेही ऐकले नाही.

शरद पवारांवर टीका करताना अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मी मुंबईला पोहोचेपर्यंत प्रफुल्ल पटेल यांनी भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा आहे, असे जाहीर केले. मी म्हटले हे कसे काय झाले, तर मला म्हणाले ही आपली स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे यांनी केले की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी. मी केलं की वाटोळं, असा घणाघात अजित पवार यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.