Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : 65 वर्षीय नराधमाकडून 7 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत FIR

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलीला जवळ बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील चाळे करुन लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याचा प्रकार उंड्री परिसरात घडला आहे. याप्रकरणी 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.6) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 43 वर्षीय आईने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन साहेबराव धर्माजी घायतडके (वय-65 रा. बिबवेवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 354 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 7 वर्षाची मुलगी लिफ्टमधून जात होती.त्यावेळी लिफ्टमध्ये आरोपीने मुलीला जवळ बोलवून घेतले. तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन तिचे लैंगिक शोषण केले. तसेच तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला.पीडित मुलीने याबाबत आईला सांगितले असता त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.

Pune Hadapsar Crime | आमदार रोहित पवार यांच्या माजी अंगरक्षकाने भर रस्त्यात रोखले पिस्तुल; दुचाकी घासल्याने तरुणाला दिली जीवे मारण्याची धमकी
Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन शरीर संबंधाची मागणी, तरुणाला अटक; हडपसर परिसरातील धक्कादायक प्रकार

Leave A Reply

Your email address will not be published.