Pune Pimpri Crime News | नातेवाईकांच्या नावाने फर्म बनवून इंनटेक्स कंपनीला 2 कोटींचा गंडा; पिंपरी चिंचवड परिसरातील प्रकार; 22 वर्षीय तरुणीसह परराज्यातील चौघांवर FIR

0

पिंपरी : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | नातेवाईकांच्या नावाने वेगवेगळ्या फर्म बनवून इंनटेक्स कंपनीकडून (Inntex Company) माल खरेदी केला. मात्र, खरेदी केलेल्या मालाचे 2 कोटी 17 लाख 27 हजार 088 रुपये न देता कंपनीची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तामीळनाडू येथील 22 वर्षीय तरुणीसह चार जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात (Pimpri Police) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

याप्रकरणी विलास बद्रीगीर गिरी (वय- 36 रा. संतनगर लोहगाव, पुणे) यांनी रविवारी (दि.26) सांगवी पोलिस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून तामिळनाडू राज्यातील थिरुवलरु येथील 22 वर्षीय तरुणी, सुगुमार एम (वय- 44 रा. पुंगानगर, तिरुवल्लुर, तामिळनाडू) हरिकृष्णन (रा. कुमारनगर, कोईबबेडु, चेन्नई, तामिळनाडू), टी. कुमारावेल (रा. व्हि.एम. नगर, कक्कालुर, तिरुवेल्लर, तमिळनाडू) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 17 सप्टेंबर 2022 ते आज पर्यंत पिंपळे गुरव येथील इंटेक्स कंपनीच्या कार्यालयात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीसत्यसाई ट्रेडर्स फर्मची (Sri Satyasai Traders Firm) मालकीण असलेल्या
22 वर्षीय तरुणीने कंपनीची फसवणुक करण्याच्या उद्देशाने नातेवाईक, मित्रांच्या नवीन वेगवेगळ्या फर्म बनवल्या.
आरोपी तरुणीने श्री सत्यसाई ट्रेडर्स पार्टनरशिप फर्म षणमुगा एंटरप्रायजेस (Partnership Firm Shanmuga Enterprises),
श्रीराम ट्रेडर्स (Sriram Traders) या प्रोप्रायटर फर्म वडील व नातेवाईक, मित्रांच्या नावाने स्थापन केल्या.
ही माहिती तिने कंपनीला न देता माहिती कंपनीपासुन लपवुन ठेवली. (Pune Pimpri Crime News)

त्यानंतर तिने वेगवेगळ्या फर्मद्वारे कंपनीबरोबर व्यवहार करुन प्रथम कंपनीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर इनटेक्स कंपनीकडुन 2 कोटी 17 लाख 27 हजार 088 रुपयांचा माल घेतला.
मात्र घेतलेल्या मालाचे पैसे न देता कंपनीची आर्थिक फसवणूक केली. यासाठी आरोपी तरुणीला इतर आरोपींनी मदत
केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक टि.एस. भोगम (API T.S. Bhogam) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.