Bhandara Accident News | मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो आणि ट्रकचा भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

भंडारा : Bhandara Accident News | मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये बोलेरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात भंडारा शहराजवळील बेला येथे रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रायपूरकडून आलेले बोलेरो वाहन नागपूरकडे जात होते. यामध्ये पाच जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये हे सर्व जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असताना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. तर, चालक गंभीर जखमी आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील कारवाईही करण्यात आली आहे. घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली होती.