Pune Crime News | पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड ! कात्रज येथील लाटमे पेट्रोल पंपावर टाकणार होते दरोडा, आंबेगाव पोलिसांची कामगिरी

Pune Crime Branch News | Thief who robbed a house and looted property worth Rs 15 lakhs arrested; Performance of the anti-robbery and anti-vehicle theft squad
25th April 2025

पुणे : Pune Crime News | कात्रज येथील लाटमे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला आंबेगाव पोलिसांनी (Ambegaon Police) अटक केली. या टोळीकडून पोलिसांनी कोयता, मिरची पुड, दोरी, दुचाकी असा ४० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. (Arrest In Robbery Case)

याबाबत पोलीस अंमलदार हनुमंत मासाळ यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सौरभ गोरक्ष चौधरी Saurabh Goraksh Chowdhary (वय २३ रा. जय शंकर कॉलनी, अंजनी नगर, कात्रज), ओंकार महादेव देवकाते Omkar Mahadev Devakate (वय २२, रा. गल्ली क्रमांक ७, संतोष नगर, कात्रज ), रघुनाथ प्रकाश मटकट्टे Raghunath Prakash Mattakatte (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी व पोलीस अंमलदार भोसले, कातुर्डे, हनुमंत मासाळ हे २४ एप्रिल रोजी रात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पुणे सातारा रोडवरील गंधर्व लॉन्सच्या मागील बाजूला मोकळ्या जागेमध्ये अंधारामध्ये ५ ते ६ जण हत्यारासह थांबले आहेत. या बातमीनुसार पोलिसांनी या टोळक्याला चारही बाजूने घेरुन पकडले. त्यांच्यातील दोघांकडे एक एक कोयता, तिसर्‍याकडे दुचाकी व त्याच्या डिक्कीत मिरची पुड, दोरी मिळून आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सांगितले की, त्यांना पैशांची आवश्यकता असल्यामुळे ते सर्व जण कात्रज येथील लाटमे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी जमले होते. पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी तपास करीत आहेत.