Ashwini Bidre Case Court Decision | अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरूंदकरला जन्मठेप, तर महेश फळणीकर, कुंदन भंडारीला सात वर्षाची शिक्षा

पनवेल : Ashwini Bidre Case Court Decision | अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. बिद्रे हत्याप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीला सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत पनवेल सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
अश्विनी बिद्रेची हत्या अत्यंत क्रुरपणे करण्यात आल्याचे म्हणत न्यायालयाने सोमवारी (२१ एप्रिल) आरोपींना शिक्षा सुनावली आहे. अश्विनी बिद्रे यांची २०१६ मध्ये त्यांचे सहकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांनी हत्या केली होती. गेली ९ वर्षे हा खटला सुरू होता. त्यावर आज निकाल देण्यात आला आहे.
बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे अपहरण आणि हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी असल्याचेच समोर आले आहे. तर महेश फळणीकर आणि कुंदनलाल भंडारी यांना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी जाहीर करण्यात आले. मात्र याप्रकरणातील दोन क्रमांकाचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याला पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. ९ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला. या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिका आणि कार्यपध्दतीवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहे.