Nagpur Crime News | ‘तेरी मेरी यारी…, मानसिक तणावातून गळफास घेत मित्राने आयुष्य संपवलं, विरह सहन होईना, दोन दिवसांनी दुसऱ्यानेही विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली

Nagpur Crime News | 'Teri Meri Yaari...', friend ends life by hanging himself due to mental stress, Unable to bear the separation, two days later another also ends life by consuming poison

नागपूर: Nagpur Crime News | जिवलग मित्राच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी विष प्राशन करून दुसऱ्यानेही आपली जीवनयात्रा संपवली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मोनल जगनाडे (वय-२८) याने जीवन संपवल्यानंतर विरह सहन न झाल्याने सचिन देशमुख (वय-२८) यानेही विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. या घटनेची नोंद नवीन कामठी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. (Suicide Case)

अधिक माहितीनुसार, मोनल जगनाडे आणि सचिन देशमुख दोघे बालपणापासूनचे जिवलग मित्र होते. त्यांच्यात केवळ मैत्री नव्हे तर कौटुंबिक नातेही होते. दोघेही एकत्र फिरत आणि प्रत्येक गोष्टीत एकत्र सहभागी व्हायचे. मात्र, काही महिन्यांपासून मोनल वैयक्तिक समस्यांमुळे मानसिक तणावात होता. दारूचे व्यसन आणि वैवाहिक जीवनातील संघर्षामुळे मोनल खचून गेला होता. त्यातच पत्नी घर सोडून गेल्याने तो अधिकच एकटा पडला होता. आपले दुःख तो वारंवार सचिनकडे व्यक्त करत राहायचा.

१२ एप्रिल रोजी मोनलने मानसिक तणावातून गळफास घेत जीवन संपवले. या घटनेचा मोठा मानसिक आघात सचिनवर झाला होता. मित्राच्या निधनाने तो पूर्णपणे खचला होता. त्याने जवळच्या मित्रांना सांगितले की, “माझा मित्र मला बोलावतोय…तो माझ्याशिवाय राहू शकत नाही…मला त्याला भेटायला जायचे आहे.” या भावनिक अवस्थेत १४ एप्रिल रोजी सचिनने विष प्राशन केले. आईने वेळीच लक्ष दिल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.