Sangli Accident News | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर टँकरला दुचाकीची धडक; 5 वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident | Terrible accident on Samruddhi Highway, one woman died on the spot; 5 injured

सांगली : Sangli Accident News | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) उभ्या असलेल्या टँकरला दुचाकी ठोकरल्याने एका लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. या अपघात प्रकरणी टँकर चालकाविरुध्द इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जिप्सीसमोर वाहतुकीस अडथळा ठरेल, या पध्दतीने टँकर लावण्यात आला होता. या टँकरला कराडकडे निघालेल्या दुचाकीने ठोकरले. यात गार्गी रवींद्र पाटील ही ५ वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक रोहन राजेंद्र पाटील (वय २४) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी टँकरचालक सचिन पाटील याच्याविरुध्द इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.