Anna Bansode | टपरी चालक ते विधानसभा उपाध्यक्ष; राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष, बिनविरोध निवड

पुणे : Anna Bansode | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी महायुतीच्या वतीने केवळ बनसोडे यांचा अर्ज आला होता. आज दुपारी अर्ज पडताळणीत वैध ठरला आहे. उद्या बुधवार (दि.२६) सभागृहात विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची अध्यक्षांकडून घोषणा केली जाणार आहे. अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
उपाध्यक्षपदासाठी पक्षात माजी मंत्री संजय बनसोडे, राजकुमार बडोले आणि अण्णा बनसोडे या तिघांच्या नावांची चर्चा होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.