Pune Crime News | पुणे : क्रेटा कार, थार जीपमधुन येऊन जुगार खेळणार्‍यांवर पोलिसांचा छापा; क्रेटा, थारसह 25 लाखांचा माल केला जप्त

Teen Patti-Raid

पुणे : Pune Crime News | लोणी काळभोर येथील कुंजीरवाडीमधील गाढवे मळा येथे क्रेटा कार आणि थार जीपमधून येऊन तीन पत्ती जुगार खेळणायांवर पोलिसांनी छापा घातला. त्यात क्रेटा कार व थार जीप सह २५ लाख १६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. (Police Raid On Gambling Den)

याबाबत पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी उमेश ऊर्फ टका निवृत्ती राखपसरे (वय ५०, रा. बेटवस्ती, गाढवे मळा, ता. हवेली), अक्षय राजेंद्र चौधरी (वय २६, रा. सोरतापवाडी, ता. हवेली), शाम वामन गायकवाड (वय ४७, रा. कोलवडी, ता. हवेली), ऋतिक राजेंद्र जाधव (वय २०, रा. जाधववस्ती, थेऊर, ता. हवेली), देवराम ज्ञानोबा गायकवाड (वय ३६, रा. कोलवडी, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी छापा टाकल. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोघे जण पळून गेले. ही घटना कुंजीरवाडी गावातील गाढवे मळा येथे रविवारी रात्री पावणेआठ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार, सोनटक्के, हवालदार जोगदंड, आहेर, पोलीस अंमलदार ढमढेरे, माळी आणि अजिंक्य जोजारे हे थेऊर फाटा येथे पेट्रोलिंग करीत असताना हवालदार जोगदंड व आहेर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कुंजीरवाडी येथील गाढवे मळा येथील माऊली राखपसरे यांच्या घरासमोर काही जण तीन पत्ती जुगार पैसे लावून खेळत आहेत. त्याबरोबर पोलिसांनी तेथे जाऊन छापा टाकला. पोलिसांना पाहून दोघे जण शेतात पळून गेले. पोलिसांनी पाच जणांना पकडले. जुगाराचे साहित्य, रोकड व वाहने असा २५ लाख १६ हजार रुपयांचा माल पकडण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार तपास करीत आहेत.