Pune Crime News | पुणे : डान्स फ्लोअरवर तरुणींना धक्का मारुन महिला बाऊंसरला अश्लिल शिवीगाळ; विनयभंगाचा धक्कादायक प्रकार, ईशान्य मॉलमध्य असलेल्या पबमधील घटनेत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pubs In Pune

पुणे : Pune Crime News | पबमधील डान्स फ्लोअरवर डान्स करत असताना ते डान्स करणाया इतर तरुणींना धक्का मारत होते. ही बाब तेथील महिला बाऊंसरने त्याबाबत त्यांना सांगितल्यावर त्यांनी या महिला बाऊन्सरला अश्लिल शिवीगाळ करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गणेश दादाभाऊ घावटे (वय ३४, रा. मु. पो. अण्णापूर, ता. शिरुर) आणि यश कोतवाल (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरुर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला बाऊन्सरने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना इर्शान्य मॉलमधील हॉटेल किग्जमध्ये शनिवारी मध्यरात्री पाऊण वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य मॉलमध्ये हॉटेल किग्ज हा पब आहे. या पबमध्ये मध्यरात्रीनंतरही अनेक तरुण तरुणी डान्स फ्लोअरवर डान्स करत होते. त्यात गणेश आणि यश हे दोघेही डान्स करताना तेथे डान्स करत असलेल्या इतर तरुणींना धक्का लावत होते. हे पाहून तेथील महिला बाऊन्सर यांनी या दोघांना बाजूला डान्स करायला सांगितले. तेव्हा या दोघांनी या महिला बाऊन्सरला अश्लिल शिवीगाळ करुन विनयभंग केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करीत आहेत.