Pune Crime News | पुणे : भेटायला बोलावून मोबाईलमध्ये शुटिंग करुन जबरदस्तीने टोळक्याने लुबाडले; अॅपवरील मैत्री पडली महाग, आरटीओ सिग्नल चौकाजवळील घटना

पुणे : Pune Crime News | अॅपवरुन झालेल्या आळखीतून त्याने भेटायला बोलावले. हाही त्याला भेटण्यासाठी पिंपरीगावातून आरटीओ जवळ आला. त्याने रेल्वेच्या खालून सिमा भिंतीतून पलीकडे नेले. तेथे अगोदरच थांबलेल्या तिघांनी त्याचे मोबाईल फोनमध्ये शुटिंग करत त्याला मारहाण करुन लुबाडले. डेबिट कार्डवरुन पैसे काढले.
याबाबत पिंपरी गाव येथील एका ३८ वर्षाच्या नागरिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शाहरुख टॉप व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आर टी ओ सिग्नल चौकाजवळ १८ मार्च रोजी घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाची एक अॅपवरुन शाहरुख टॉप याच्याशी ओळख झाली होती. शाहरुख टॉप याने त्याला भेटायला बोलावले. त्यानुसार तो आरटी ओ सिग्नल चौकात त्याला भेटायला आला. शाहरुख टॉप याने एका सिमी भिंतीच्या भगदाडातून त्याला आत नेले. तेथे अगोदरच तिघे जण थांबले होते. त्यांनी त्यांचे मोबाईलवर शुटिंग करुन फिर्यादी यांना धमकावून मारहाण केली. तेव्हा शाहरुख टॉप हा तेथून पळून गेला. त्यानंतर या तिघांनी फिर्यादी यांना मारहाण करुन डेबीट कार्ड, मोबाईल व चावी काढून घेतली. फिर्यादी यांच्या बँक खात्यावरुन ९ हजार ५०० रुपये काढून घेतले. त्यानंतर शाहरुख टॉप हा तेथे परत आला. त्यांनी लाकडी फांदीने फिर्यादीला मारहाण करुन जखमी केले. ही बाब फिर्यादी यांनी कोणाला सांगितली नव्हती. शेवटी धीर करुन त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार तपास करीत आहेत.