House of Faheem Khan Demolished In Nagpur | नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहिम खानच्या घरावर अखेर बुलडोझर

नागपूर : – House of Faheem Khan Demolished In Nagpur | नागपूर हिंसाचारमधील दंगेखोरांना अटक करण्यात आली असून, आता त्या हिंसाचारातील मुख्य आरोपी आणि घटनेचा मास्टर माईंड असलेल्या फहीम खान याच्या घरावरच बुलडोझर चालविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर दंगलीचा कथित मास्टर माईंड फईम खान यांच्या घरावर नागपूर महापालिकेकडून सोमवारी, आज बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे. फहीम खान याच्या नागपूरच्या टेकानाका परिसरातील घर बांधतांना काही भागात अतिक्रमण केले आहे. महापालिकेने त्याच्या कुटुंबाला याबाबत नोटीस बजाविल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाई करण्यात येत आहे.

महापालिकेच्या पथकाकडून आज सकाळी 10 वाजल्यापासून फहीम खान याच्या घराची तोडफोड सुरू करण्यात आली. त्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फहीम खान यांच्या आईच्या नावावर नोंदणीकृत असलेले हे 86.48 चौरस मीटरचे घर बेकायदेशीररीत्या बांधल्याचे महापालिकेने 21 मार्चला नोटीस बजावली होती, त्यात नमूद केले होते. आता या कारवाईला वेग आला आहे. दुसरीकडे या कारवाईतून दंगेखोरांना राज्य सरकारने एक संदेशच दिल्याची चर्चा आहे.

महापालिकेच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर यशोधरानगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक पोलीस, एसआरपीएफच्या दोन तुकड्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता याप्रकरणी फहीम खानच्या अडचणी आणखी वाढल्याचे चित्र पाहायला मिळते. (Nagpur Violence News)