Pune Crime News | पत्नीची फसवणूक करुन 5 कोटीचे कर्ज काढणार्‍या हॉटेल वैशालीच्या मालकाचा जावई विश्वजीत जाधव याला अटक

Pune Crime News | Criminal on record, who was absconding for a year, arrested! He had absconded after being ordered to be detained.

पुणे : Pune Crime News | पत्नीच्या नावावर असलेला फ्लॅट गहाण ठेवून त्याद्वारे ५ कोटी रुपयांचे कर्ज काढणारा हॉटेल वैशालीच्या (Hotel Vaishali) मालकाच्या जावयास आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

विश्वजीत विनायकराव जाधव Vishwajit Vinayakrao Jadhav (वय ४१, रा. आरंभ अपार्टमेंट, घोले रोड, शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत निकीता जगन्नाथ शेट्टी (वय ३४, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ डिसेंबर २०२२ ते ३ ऑक्टोबर ३०२३ दरम्यान घडला होता. (Cheating Fraud Case)

विश्वजीत जाधव याने आर आर फायनान्सचे रवी परदेशी तसेच कोटक महिंद्रा बँक येरवडा शाखेचे मॅनेजर राजेश चौधरी यांच्याबरोबर संगनमत करुन निकिता हॉस्पिटॅलिटी एल एल पीच्या कार्यालयात बैठका घेतल्या. फिर्यादी यांच्या संमतीविना कोटक महिंद्रा बँकेतून कर्ज काढण्याकरीता कर्ज फॉर्म व इतर कागदपत्रांवर फिर्यादी यांच्या खोट्या सह्या करुन या सह्या खर्‍या असल्याचे भासवले. तसेच बनावट शिक्क्यांचा वापर करुन त्यांच्या आधारे बनावट दस्त तयार करुन फिर्यादीच्या नावावर असलेला फ्लॅट कोटक महिंद्रा बँकेकडे तारण ठेवला. बँकेकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन स्वत:चे अ‍ॅक्सीस बँकेत ४ कोटी ९३ लाख रुपये वळते करुन फिर्यादीच फसवणूक केली. विश्वजीत जाधव, रवी परदेशी आणि राजेश चौधरी यांचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला असून तेव्हापासून ते फरार होते. त्या तिघांपैकी विश्वजीत जाधव याला आज दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

विश्वजीत जाधव याने बोगस कर्ज मंजूर करुन घेऊन ४ कोटी ९३ लाख रुपयांचा काय विनियोग केला, याबाबत आरोपीकडे पोलीस कोठडीमध्ये घेऊन सखोल चौकशी आवश्यक आहे. या गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करणे बाकी आहे. या कटामध्ये अन्य कोणी मदत केली आहे का याचा तपास करायचा आहे. या गुन्ह्यात वापरलेला बनावट शिक्का हस्तगत करायचा आहे.

विश्वजीत जाधव याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुक तसेच कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल आहे़ यावरुन आरोपी हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचे दिसून येत आहे. आरोपीने अशाच प्रकारे अन्य गुन्हे केले आहेत किंवा कसे याबाबत पोलीस कोठडीमध्ये चौकशी करणे आवश्यक असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ए. बी. गायकवाड यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.