Pune Crime News | शिक्षण संस्थाचालकाकडे 25 लाखांची खंडणी मागणार्‍या माजी कर्मचार्‍यास अटक

Sinhagad Road Pune Crime News | Pune: Sinhagad Road Police arrested a criminal who came to Pune while he was in exile and was carrying a pistol along with his accomplice.

पुणे : Pune Crime News | शिक्षण संस्थाचालकाना तुमचा मुलगा व महिला कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आहेत. आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ माझ्याकडे आहेत. हे व्हिडिओ व्हायरल करायचे नसतील तर २५ लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या संस्थेच्या माजी कर्मचाºयाला सिंहगड रोड पोलिसांनी जेरबंद केले.

सुदर्शन कांबळे (रा. धायरी फाटा) असे या माजी कर्मचार्‍याचे नाव आहे. सुदर्शन कांबळे हा या शिक्षण संस्थेत सीसीटीव्ही कॅमेर्‍याबाबतचा टेक्नीशियन म्हणून काम करत होता. कोराना काळात त्याने येथील काम सोडले होते़ हा प्रकार ६ मार्च पासून सुरु होता.

याबाबत शिक्षण संस्थाचालकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुदर्शन कांबळे हा ६ मार्च रोजी शिक्षण संस्थेच्या आवारात आला. त्याने शिक्षण संस्थाचालकांच्या मोबाईलवर मेसेज पाठविला. तुमचा मुलगा आणि एक महिला कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आहेत. आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ माझ्याकडे आहेत. हे व्हिडिओ ८०० पेनड्राईव्हमध्ये देऊन संस्थेची बदनामी करेल. संबंधित वृत्त प्रसारित न करण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने वारंवार फोन मेसेज पाठवून खंडणी मागितली. संस्थाचालकांनी शेवटी पोलिसांकडे धाव घेतली.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे यांनी सांगितले की, सुदर्शन कांबळे हा संस्थेमध्ये टेक्नीशियन म्हणून कामाला होता. कारोना काळात त्याने नोकरी सोडवली होती. आपल्याकडे व्हिडिओ असल्याचे सांगितले तर ते पैसे देतील, असे वाटल्याने त्याने खंडणी मागितली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन त्याचे लोकेशन निश्चित करुन त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण तपास करीत आहेत.