PSI Amol Ghodke Suspended | थेऊर गोळीबार प्रकरण: मुख्य आरोपीस अप्रत्यक्ष मदत करणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित

Police Inspector Suspended In Pune | Police Inspector Suspended for Being Absent for a Year; Action Taken by Police Commissioner Amitesh Kumar

पुणे : PSI Amol Ghodke Suspended | थेऊर गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीस अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. अमोल घोडके असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी काढले आहेत.

महिलेच्या डोक्यात दगड मारून, तसेच पतीवर पिस्तुलातून गोळीबार करून पसार झालेल्या सर्व आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दगड मारल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

थेऊर येथील घडलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी भरत जैद याला पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी मदत केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. घोडके यांना निलंबन काळात कोणतीही खासगी नोकरी करता येणार नाही. त्यांनी दररोज शिवाजीनगर येथील पुणे पोलीस मुख्यालय राखीव पोलीस निरीक्षक यांच्याकडे हजेरीसाठी उपस्थित राहावे, असे आदेशात नमूद आहे.