Swargate Rape Case | पुणे: स्वारगेट रेप केसमधील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलावर जीवघेणा हल्ला; शर्ट फाडला, लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण, किडनॅप करून बोपदेव घाटात नेलं

पुणे : Swargate Rape Case | स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साहील डोंगरे (Sahil Dongre) असे आरोपी दत्ता गाडेच्या (Datta Ramdas Gade) वकिलाचे नाव आहे. सोमवार (दि.१७) सायंकाळी डोंगरे यांचे अपहरण करण्यात आले. अपहरण करून त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले. दिवे घाटात त्यांना मारहाण करण्यात आली.

मारहाण झाल्यानंतर डोंगरे यांना सोडून देण्यात आले. जखमी अवस्थेत डोंगरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात जात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. प्राणघातक हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून, नेमके कुणी आणि का हल्ला केला? याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, ऍड. डोंगरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.