Yavatmal Crime News | अनैतिक संबंधाच्या संशय, 35 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, परिसरात खळबळ

यवतमाळ : Yavatmal Crime News | अनैतिक संबंधाच्या संशयावरून ३५ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आशिष सोनोने (वय- ३५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. (Murder Case)
यवतमाळच्या वाघापूर परिसरातील जय महाराष्ट्रनगरमध्ये आज (दि.१७) पहाटे चार वाजताच्या सुमारास आशिष सोनोनेची हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून चार जणांनी आशिषच्या डोक्यावर दगडाने घाव केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिषचा जागीच मृत्यू झाला.
या हत्येची माहिती मिळताच यवतमाळच्या लोहारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आशिषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी लोहारा पोलिसांनी ४ जणांना अटक केली. अनैतिक संबंधातून आशिषची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत