Solapur Crime News | विवाहितेला ब्लॅकमेलिंग करत शारीरिक संबंध, त्यातूनच २८ वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या, पोलीस तपासातुन पुढे आली माहिती

सोलापूर : Solapur Crime News | आकाश खुर्द पाटील या २८ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार माळशिरस तालुक्यात घडला होता. दरम्यान आता या प्रकरणाबाबत महत्वाची माहिती उघडकीस आली आहे. पिलीव येथील आकाशचे चांदापुरी (ता. माळशिरस) येथील महिलेशी सन २०२३ पासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची कुणकुण १७ वर्षांचा मुलगा आणि नोकरीसाठी परगावी राहात असलेल्या नवऱ्याला लागली होती. (Murder Case)
आकाश आणि ती संबंधित महिला यांच्या मोबाईल चॅटिंगवरून नवऱ्यासह मुलास दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल पक्की खात्री पटली होती. आकाश खुर्द-पाटील याला जीव मारण्याचा त्या तिघांचा प्लॅन नव्हता. बेदम मारहाण केल्यास, जिवाच्या भितीने तो प्रेमसंबंध कायमचे थांबवेल, असा त्यांचा कयास होता. त्यातून त्यांनी आकाशला शेतात बोलावून लोखंडी पाईपने मारहाण केली, हे प्राथमिक तपासातून सिद्ध झाले आहे.
आकाशसोबतचे प्रेमसंबंध ‘त्या’ महिलेस नको होते. मात्र तो प्रेमसंबंध तोडण्याला तयार नव्हता. ‘माझ्यासोबतचे प्रेमसंबंध तोडल्यास तुझ्यासोबतचे नग्नावस्थेमधील व्हिडीओ व्हायरल करुन तुझी बदनामी करीन’ अशी तिला तो धमकी देऊन शारिरीक संबंध ठेवत होता. त्याच्या धमक्यांना आणि बळजबरीच्या शारिरीक संबंध ठेवण्याला ती वैतागली होती.
शिवाय आपल्या आईला आकाश धमकावतोय, तो तिच्याशी लगट करतोय हे मुलास पटत नव्हते. तसेच आपल्या आयुष्याच्या जोडीदारीनीसोबत कोणी असणे, नातेवाईकांत, गावात तसेच समाजामध्ये त्यातून इज्जत जाणे हे नवऱ्यासाठी तळपायाची आग मस्तकाला जाण्यासारखे होते. त्यातूनच आकाश खुर्द-पाटील याचा खून झाल्याची माहिती पोलीस तपासामधून पुढे आली आहे.