Ahilya Nagar Crime News | समलैंगिक संबंधाबाबत समजल्याने युवकाचा खून ! मुंडके, दोन्ही हात, उजवा पाय धडापासून वेगळे करुन मृतदेह पोत्यात भरुन विहीरीत टाकला

अहिल्यानगर : Ahilya Nagar Crime News | श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील शेतातील विहीरीत मुंडके, दोन्ही हात, उजवा पाय धडापासून वेगळे करुन तो मृतदेह एका पोत्यात भरुन टाकण्यात आले होते. या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. (Murder Case)
माऊली सतीश गव्हाणे (वय १९, रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) असे खुन झालेल्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. तर, पोलिसांनी सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २०, रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) याला अटक केली आहे. त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे. समलैंगिक संबंधाबाबत समजल्याने युवकाचा खुन झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाणेवाडी येथील विठ्ठल दत्तु मांडणे यांच्या शेतातील विहिरीत एक पोते तंरगत असल्याची माहिती १२ मार्च रोजी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ते पोते बाहेर काढले. तेव्हा त्यात मुंडके, दोन्ही हात, उजवा पाय धडावेगळे करुन टाकलेले दिसत होते. या मृतदेहाचे इतर अवयवाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण विहिरीतील पाणी उपसले, तरीही इतर अवयवाचा शोध लागला नाही.
गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरीत केला. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणण्याचा आदेश दिला. तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन जिल्ह्यातील सर्व मिसिंगची माहिती घेतली. मृतदेहाचे फोटो कानातील बाळी तसेच मयताचे यापूर्वीचे फोटो यावरुन नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत हा मृतदेह माऊली सतीश गव्हाणे याचा असल्याचे निष्पन्न झाले.
माऊली गव्हाणे हा ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्या परिसरात पोलिसांनी चौकशी केली. त्यातून सागर गव्हाणे याची माहिती मिळाली. पोलिसांनी सागर गव्हाणे याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर खुनाचे कारण पुढे आले. सागर गव्हाणे व दाणेवाडी येथील एका युवकाचे समलैंगिक संबंध होते. ते संबंध माऊली गव्हाणे याला माहिती झाले होते. या कारणावरुन सागर व त्याच्या मित्राने इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने माऊली गव्हाणे याचा निर्घुण खुन केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, शाहीद शेख, बिरप्पा करमल, अरुण गांगुर्डे, संतोष खैरे, रवींद्र घुंगासे, आकाश काळे, विशाल तनपुरे, सागर ससाणे, प्रमोद जाधव, रोहित मिसाळ, अशोक लिपणे, अमोल कोतकर, मनोज लातुरकर, जालींदर माने, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे.