Solapur Crime News | पोटच्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेत आईने संपवलं जीवन, घटनेने खळबळ

सोलापूर : Solapur Crime News | आपल्या पोटच्या दोन मुलांसह आईने विहिरीत उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चित्रा हणमंत शिंदे (वय-२७), मुलगा स्वराज हणमंत शिंदे (वय- साडेतीन वर्षे) व मुलगी हिंदवी हणमंत शिंदे (वय-दीड महिना) असे या घटनेत मृत्यू झालेल्या आई व चिमुकल्यांची नावे आहेत. ही घटना हबिसेवाडी (ता- सांगोला) येथे सोमवारी (दि. ३) रात्री घडली. (Suicide Case)

याप्रकरणी योगेश शहाजी गळवे (रा- हबिसेवाडी, ता- सांगोला, सध्या रा- न्यू पनवेल, नवी मुंबई) यांनी पोलिसात खबर दिली आहे. त्यानुसार, सोमवारी रात्री अचानक अज्ञात कारणावरून चित्रा शिंदे ही दोन्ही मुलांसह आपल्या घरातून निघून गेली. दोन्ही लहान मुले आणि चित्रा शिंदे घरात नसल्याने सर्वांनी शोधाशोध केली असता शेजारीच असलेल्या किसन खरात यांच्या विहिरीत सोमवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास सर्वांचे मृतदेह आढळून आले. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.