Crime News | इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलीची ओळख ! अत्याचार केल्या प्रकरणी कार्तिक कोहरे विरुद्ध गुन्हा दाखल

घाटंजी : Crime News | इन्स्टाग्रामवरुन अल्पवयीन मुलीची ओळख करून अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी कार्तिक सुनील कोहरे (रा. पाटीपुरा यवतमाळ) विरुद्ध चांदूररेल्वे पोलीस ठाण्यात झिरोवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी कार्तीक कोहरे यास यवतमाळ शहर पोलीसांनी अटक केली आहे. (Molestation Case)

आरोपी कार्तीक कोहरे हा दिड वर्षापासून पिडीत मुलीच्या संपर्कात होता. पिडीते सोबत तो नेहमी सोशल मीडिया व भ्रमणध्वनी वरुन बोलत होता. पिडीते सोबत प्रेमाच्या आणाभाका झाल्यावर पिडीतेला यवतमाळच्या घरी भेटायला बोलाविले. कार्तीक कोहरेचे आई वडील मजुरीला गेल्यावर अल्पवयीन मुलीवर त्याच्या राहत्या घरी अत्याचार केला. आरोपी कार्तीक कोहरे हा नेहमी पिडीत मुलीला धमक्या देत असल्याने पिडीत मुलीने अखेर चांदूररेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन आरोपी कार्तीक सुनील कोहरे विरुद्ध अत्याचार, माहिती तंत्रज्ञान कायदा व पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकरणाचे घटनास्थळ यवतमाळ येत असल्याने सदरचा गुन्हा यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुजाता मनवर यांचे कडे देण्यात आला आहे.