Amravati Crime News | जुन्या वादातून 26 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या, परिसरात खळबळ

अमरावती : Amravati Crime News | जुन्या वादातून २६ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. आदर्श साहू (वय- २६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अभिषेक साहू असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो दोन दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. (Murder Case)
अधिक माहितीनुसार, मसानगंज आणि इतवारा बाजार परिसरालगत मिरची कांडप केंद्राजवळ आदर्श साहू उभा असताना अभिषेक साहू हा एका युवकासोबत दुचाकीने तेथे आला. कोणाला काही कळायचा आता अभिषेक साहू याने आदर्श साहूच्या पोटात चाकूने सपासप वार केले. त्यानंतर तो घटनास्थळावरुन पसार झाला. यानंतर आदर्श साहू याच्या मित्रांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी आदर्शला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
७ ऑक्टोबर २०२४ रोजी आदर्श साहूचा मावस भाऊ वैभव पटेरिया याची काही युवकांनी हत्या केली होती. यामध्ये एक आरोपी म्हणून अभिषेक साहू हा पण होता. वैभव पटेरिया हत्या प्रकरणात अभिषेक साहू हा कारागृहात होता. आता दोन दिवसांपूर्वीच तो कारागृहाबाहेर आला होता. दोन कुटुंबात अनेक दिवसांचा वाद आहे. या वादातूनच आधी वैभव पटेरिया आणि आता आदर्श साहूची हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.