Accident News | लग्न व-हाडाच्या वाहनाला अपघात; अविनाश शेंडे याचा मृत्यू

घाटंजी : वाहनाच्या कॅबिनेट बसुन प्रवास करणाऱ्या अविनाश शेंडे (वय २०, रा. घोटी) या तरुणाचा वाहनातून पडुन मृत्यू झाला. सदरची घटना घाटंजी तालुक्यातील दहेगांव ते शिरोली मार्गावर रविवारी घडली.
मृतक अविनाश शेंडे हा रविवारी घाटंजी येथे लग्नासाठी वरातीत गेला होता. परत गावाकडे जाण्यासाठी मॅक्स पिकअप क्रंमाक एमएच २९ एम १६३७ या वाहनात अविनाश शेंडे हा वाहनाच्या कॅबिनवर बसला होता. वाहन चालकाने अचानक शिरोली गावाजवळ ब्रेक मारल्याने अविनाश शेंडे हा कॅबिनवरुन खाली पडला. त्याला लोखंडी एंगल लागल्याने तो जखमी झाला होता. या प्रकरणी घाटंजी पोलीस तपास करीत आहे.