Wagholi Pune Crime News | पुणे : आंतरजिल्हा गांजा तस्करी करणारे टोळके जाळ्यात; 4 आरोपींकडून 4 किलो 771 ग्रॅम गांजा जप्त (Video)

पुणे : Wagholi Pune Crime News | नागपूरहून पुण्यात विक्रीसाठी गांजा घेऊन आलेल्या आंतर जिल्हा तस्करांना वाघोली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल 4 किलो 771 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. (Ganja Selling Case)
नागेश सुनिल लष्करे Nagesh Sunil Lashkare (वय 20), सौरभ नामदेवराव तपासे Saurabh Namdevrao Tapase (वय 22, रा. नागपूर), रिझवान इस्माईल शेख Rizwan Ismail Shaikh (वय 39) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबरील एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Wagholi Police)
वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार, सहायक पोलीस निरीक्षक अहिरे व त्यांचे सहकारी 26 फेब्रुवारी रोजी गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार मोटे यांना मिळालेल्या बातमीवरुन पोलिसांनी वाघोली रोडवर चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख रुपयांचा 4 किलो 771 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आले. तसेच मोटरसायकल जप्त करण्यात आली.
त्यातील सौरभ तपासे याने नागपूर येथून गांजा घेऊन आला होता. त्याने लष्करे, रिझवान शेख या पुण्यातील तस्करांना हा गांजा देऊन तो पुढे पुणे शहर व परिसरात त्याची विक्री करण्यात येणार होती. त्या अगोदरच पोलिसांनी हा गांजा पकडला. तपासे याने हा गांजा कोणाकडून आणला होता, याचा तपास केला जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक विनायक आहिरे, पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार, परि़ पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, पोलीस अंमलदार कर्णवर, मोटे, माने, कोकरे, रोकडे, गायकवाड, वाघ, बोयणे, कुंभार, आव्हाळे यांनी केली आहे.