Vidya Balan Dance On Marathi Song | खंडेरायाच्या लग्नाला, बानू नवरी नटली…! सोशल मीडियावर विद्या बालनच्या डान्सचा धुमाकुळ, चाहते खुश!! (Video)

मुंबई : Vidya Balan Dance On Marathi Song | बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये ती ‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली…’ या पारंपारिक मराठी गाण्यावर मराठमोळ्या अदा दाखवत डान्स करताना दिसत आहे. विद्याच्या या डान्सने चाहते भलतेच खुश झाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

विद्या बालनचा अंदाज, नृत्य कौशल्य आणि अभिनयाची जबरदस्त झलक या व्हिडिओमध्ये दिसत आहे. विद्या नेहमीच विविध प्रकारचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, या व्हिडिओला तिचे चाहते जोरदार प्रतिसाद देत आहेत. नेहमीप्रमाणे तिचा सशक्त अभिनय आणि हटके स्टाईल या व्हिडिओत दिसतेय.

पारंपारिक मराठी गाण्यावरील विद्याचा हा डान्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे नृत्य पाहून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील चाहते सुद्धा तिचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून विद्याचे मराठी प्रेम सुद्धा समोर आले आहे.

विद्या बालनने मराठी गाण्याला प्राधान्य देत केलेले हे नृत्य अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. ‘खंडेरायाच्या लग्नाला, बानू नवरी नटली’ हे गाणे मराठी लोकसंगीतात खूप लोकप्रिय असून त्यावर विद्या अगदी सहजपणे थिरकाताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.