Indapur Pune Crime News | पुणे : इंदापूरात धारदार शस्त्राने सपासप वार करत तरुणाला संपवलं

पुणे / इंदापूर : Indapur Pune Crime News | खोरोची येथील एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. उत्तम जालिंदर जाधव असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ८ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Murder Case)

अधिक माहितीनुसार, उत्तम जाधव यांच्यावर गुरुवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान उत्तम जाधव यांचा मृत्यू झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत यांनी दिली आहे.

जाधव हे इंदापूर तालुक्यातील खोरोची गावचे रहिवासी असून इंदापूर तालुक्यातील निमसाखर परिसरात त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. याप्रकरणी इंदापूर पोलिसात ८ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून इंदापूर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित ७ आरोपींचा शोध इंदापूर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

या प्रकरणात आणखीही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.