Swargate Pune Crime News | पुणे: स्वारगेट ST स्टॅन्डवरील बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेच्या आवळल्या मुसक्या (Video)

पुणे : Swargate Pune Crime News | स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षाच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय रामदास गाडे (Dattatray Ramdas Gade) याला नराधमाला पुणे पोलिसांनी (Pune Police) त्याच्याच गावातून मध्यरात्रीच्या सुमारास मुसक्या आवळल्या. (Rape In Shivshahi Bus)
पुणे पोलिसांना गुनाट गावातील कॅनॉल रोडवर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास गाडे आढळून आला. त्याला पोलिसांनी रात्रीच पुण्यात आणले असून सध्या त्याला लष्कर पोलीस ठाण्यातील (Lashkar Police Station) कोठडीत ठेवण्यात आले आहे. (Rape In Swargate ST Stand)
गेल्या मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दत्तात्रय गाडे हा थेट गावी आला होता. दिवसभर घरात थांबल्यावर रात्री कार्ल्याच्या किर्तनात हजेरी लावली. बुधवारी त्याच्या या नीच कृत्याची बातमी टीव्हीवरुन सर्वत्र सांगितली जाऊ लागली तेव्हा तो घरातून पळून गेला होता.
त्यानंतर दिवसभर तो लपून बसला होता. रात्री गावातील एका घरात पाणी मागण्यासाठी तो गेला होता. तेथील महिलेने तो आल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे गुरुवारी पुणे पोलीस दलातील जवळपास १५० पोलिसांचा फौजफाटा गुनाट गावी दाखल झाला होता. त्यांनी गावातील ऊसाच्या शेतात त्याचा शोध घेतला. त्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात आला. परंतु, सायंकाळ झाली तरी तो सापडू शकला नव्हता. रात्र झाल्याने व शेतात बिबट्याचा धोका असल्याने ही शोध मोहिम थांबविण्यात आली होती. तरीही पोलीस गावात मुक्काम ठोकून होते. रात्री तो लपून बसलेल्या ठिकाणाहून बाहेर येईल, असा पोलिसांना संशय होता. त्याप्रमाणे गावातील कॅनॉल रोडला तो गुन्हे शाखेच्या पथकाला सापडला. पोलिसांनी तो दिसताच त्याच्यावर झडप घालून पकडले. त्याला पुण्यात आणले असून त्याला रितसर अटक करण्यात येईल. त्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.