Share Market Crash Today | शेयर मार्केटमध्ये हाहाकार ! गुंतवणुकदारांचे 7 लाख कोटी बुडाले, सेन्सेक्स 900 अंकापेक्षा जास्त घसरला, निफ्टी 22,300 पेक्षा खाली, पहा टॉप लूजर्स लिस्ट

मुंबई : Share Market Crash Today | शेयर मार्केटमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा हाहाकार माजला आणि गुंतवणुकदारांमध्ये तेव्हा निराशा पसरली जेव्हा एका मोठ्या गॅप डाऊन ओपनिंगसह बाजार खुला झाला. ओपनिंग बेलसह निफ्टी 110 अंकाच्या घसरणीसह 22,433 च्या लेव्हलवर खुला झाला, परंतु खुला होताच यामध्ये आणखी घसरण दिसून आली आणि निफ्टीने पहिल्या 20 मिनिटीतच 22249 ची लो लेव्हल पाहिली. (Stock Market News)
बीएसई सेन्सेक्स 929 अंक म्हणजे 1.25% घसरून 73,683 वर आला, तर निफ्टी 50 273 अंक म्हणजे 1.21% घसरून 22,271 वर आला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नकारात्मक जागतिक संकेतांमुळे आगामी सत्रांमध्ये बाजारावर दबाव राहण्याची शक्यता आहे.
सेन्सेक्समध्ये सुद्धा बाजार खुला होताच मोठी घसरण दिसून आली आणि तो 900 अंकापेक्षा जास्त घसरून व्यवहार करत होता.
निफ्टी आज मार्च सिरिजच्या सुरूवातीलाच 1.20% च्या घसरणीत आला. बाजार उघडताच इतकी मोठी घसरण झाली की लिस्टेड कंपन्यांच्या बाजार भांडवलात 7 लाख कोटी रुपयांचा तोटा दिसू लागला आहे.
बँकिंग आणि आयटी सेक्टरमध्ये विक्री दिसून येत आहे. निफ्टी 50 पॅकमध्ये आयटी आणि बँकिंग स्टॉकची नावे टॉप लूझर्समध्ये दिसून येत आहेत. इण्डसइण्ड बँक, एमअँडडएम, टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल सारखे स्टॉकमध्ये किमान 4% घसरण दिसून येत आहे.