Pune Police News | रमजान काळात वीज, पाणीपुरवठा सुरळीत रहावा ! पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या सूचना, रमजान पूर्व तयारी

पुणे : Pune Police News | रमजानच्या महिन्यात सर्वत्र वीज, पाणी पुरवठा सुरळीत राहील याची संबंधितांनी काळजी घ्यावी, तसेच या काळात सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होणार नाही, याबाबत नियोजन करावे, अशा सूचना पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे (DCP Dr Rajkumar Shinde) यांनी दिल्या.
रमजान महिन्यास सुरुवात होत आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी कोंढव्यातील पारगेनगरमधील सिटी लॉन्स येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी डॉ. राजकुमार शिंदे बोलत होते. या बैठकीला महापालिकेचे सहायक आयुक्त अमोल पवार, घनकचरा विभागाचे आरोग्य निरीक्षक सुनील घोळवे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता रजत राठोड, अतिक्रमण विभागाचे विभागीय निरीक्षक नारायण साबळे, सांडपाणी विभागाचे कनिष्ठ अभियंता पूनम बीडकर, आरोग्य निरीक्षक राहत कोकणे, महावितरणचे अवचरे, गरजे तसेच कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक पाटणकर हडपसर, वानवडी, काळेपडळ, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदि उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी, सभासद, सदस्य यांच्या अडचणी समजावून घेण्यात आल्या. शासनाने दिलेल्या नियम, अटींचे व पोलिसांकडून दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन उत्सत आनंदात पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा हसीना इनामदार, माजी नगरसेविका नंदा लोणकर , नागरिक अधिकारी मंच चे समीर पठाण , हाजी फिरोज, रईस सुंडके, हाजी गफूर पठाण,कारी इंद्रिस, जाहिद शेख, सलिम शेख, अन्वर सुफी , उम्मीद फाउंडेशनचे अँड.रईसा शेख असे प्रतिष्ठित नागरिक, ट्रस्टी व मौलाना उपस्थित होते.
यावेळी नागरिकांना काही सूचना देण्यात आल्या
१) मस्जिदचे आजुबाजूस/वाहनांची पार्किंग होवू देऊ नये़ मस्जिदमध्ये येणारे अनोळखी व्यक्ती संशयित व्यक्ती यांचे हालचालीवर लक्ष ठेवावे.
२) भिक्षेकरी लोकांना मस्जिद जवळ थांबू देवू नये.
३) ईद चे दिवशी नमाजास येताना शक्यतो वाहने मस्जिदचे आवारात आणू नयेत. तसेच वाहने मस्जिदच्या २०० मीटर बाहेर परिसरात इतर वाहतूकीस अडथळा होणार नाही. अश्या प्रकारे पार्क करावीत. अश्या सूचना सर्व मुस्लिम बांधवांना कराव्यात
४) पोलीस स्टेशन पोलीस चौकी, रुग्णवाहिका, अग्निशामक दल, कंट्रोल रुमचे संपर्क नंबर मस्ज्दिचे दर्शनीय भागावर बोर्ड लावावेत.
५) पुरेसा प्रकाश राहील अशा लाईटची पर्यायी व्यवस्था ठेवावी.
६) मस्जिद मध्ये ज्वलन शिल (उदा. रॉकेल, पेट्रोल, गॅस) असे पदार्थ ठेऊ नयेत. अपघाताने आग लागल्यास तात्काळ आग विझविण्या करीता अग्निशामक उपकरणे, वाळूच्या व पाण्याने भरलेल्या बादल्या सहज उपलब्ध होतील अशा ठिकाणी ठेवाव्यात.
७) मस्ज्दिमध्ये व मस्ज्दि समोर समाज कंटक गुन्हेगार यांचे संशयास्पद हालचाली संशयास्पद बेवारस वस्तु, बॅग यांचे बाबत काही महिती मिळाल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे.
८) मस्जिद चे आतील आवारात व बाहेरील जाण्या-येण्याचे मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सी.सी.टि.व्ही कॅमेरा बसवावेत. कॅमरे बसविले असल्यास व्यवस्थित काम करत आहेत का त्यांचे रेकॉडीग होत आहे का याची खात्री करावी. कमित कमी एक महिन्याचा बॅकअप ठेवावा.
९) अफवांवर विश्वास ठेऊ नये. कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अफवा पसरली जाणार नाही याबाबत सूचना दयाव्यात, असे कोणी करत असल्यास त्यास प्रतिबंध करून पोलीसांना तात्काळ कळवावे.
१०) खाद्य पदार्थ विक्री करीता लावणारे स्टॉल धारक यांनी स्टॉल रस्ता सोडून वाहतूकीस अडथळा होणार नाही अशा पदधतीने लावण्यात यावे.
११) आक्षेपार्ह मेसेज सोशल मीडियावर पाठवू नयेत.
पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या
यावेळी अनेक नागरिकांनी सुचना केल्या. त्यात प्रामुख्याने रोजा सोडण्याच्या वेळी सायंकाळच्या वेळी मस्जिद परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्यास व त्यावेळी तेथे वाहतूक पोलीस उपस्थित राहील, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी तसेच सर्व वरिष्ठ अधिकार्यांनी उपस्थितींना आपले स्वत:चे मोबाईल क्रमांक देऊन काही गरज लागली तर थेट फोन करण्याचे आवाहन केले.