Kondhwa Police News | बुलेटच्या सायलेन्सरचा फटाका वाजवून त्रास देणार्यांविरोधात कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २० बुलेटचे सायलेन्सरवर फिरविला रोड रोलर (Video)

पुणे : Kondhwa Police News | बुलेटच्या सायलेन्सरचा फटाका वाजवून नागरिकांना त्रास देणार्या वाहनचालकांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. या विशेष मोहिमते २० बुलेटचे सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले.
सध्या दहावी, बारावीच्या परिक्षा सुरु आहेत. त्याचबरोबर रजमान महिना सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुलेटच्या सायलेन्सरचा फटाका वाजवून नागरिकांना त्रास देणार्या वाहनचालकांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी विशेष मोहिम आखली होती. त्यात एकाच दिवसात २० वाहनांवर कारवाई करण्यात आली. या गाड्यांचे मॉडीफाईड सायलेन्सर काढून त्यावर पुणे महापालिकेचा रोड रोलर चालवून ते नष्ट करण्यात आले.
ही विशेष मोहिम पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली.