Ahilya Nagar Crime News | ‘मुलाला बूटही घेऊ शकलो नाही, मेलेलं बरं’, आर्थिक विवंचनेतून 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेत संपवलं जीवन

Kolhapur Suicide News | Student committed suicide by hanging herself after getting low marks in 12th exam

अहिल्यानगर : Ahilya Nagar Crime News | शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सतीश उर्फ बाळा वांडेकर (वय-३२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. (Suicide Case)

अधिक माहितीनुसार, सतीशने खाजगी बँकेचे त्याचबरोबर इतर काही लोकांकडून हात उसने पैसे घेतले होते. झालेला कर्जाचा डोंगर असह्य झाल्याने वांढेकर याने टोकाचे पाऊल उचलून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटमध्ये पत्नी आणि दोन मुलांसाठी हृदयद्रावक संदेश लिहिला आहे.

” मी सतीश नामदेव वांढेकर, माझ्यावर खूप कर्ज झाले आहे, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. याला कुणीही जबाबदार नाही. मी खूप उद्योग धंदे केले, पण मला यश आले नाही. मी शेती केली तरीही यश मिळाले नाही. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. माझ्यावर १२ लाख ३९ हजार ८९४ रुपयांचे कर्ज आहे. मी खूप प्रयत्न केला, पण मला यातून बाहेर पडता आले नाही. शेवटी हा निर्णय घेतला. या कर्जातून बाहेर निघण्यासाठी बायकोने खूप प्रयत्न केले. तिने आपले मंगळसूत्र मोडून पैसे दिले, पण कर्जाचा डोंगर इतका होता की, मी यातून बाहेर पडलो नाही.

मी माझ्या बायकोचा आणि मुलांचा खूप मोठा गुन्हेगार आहे. मी त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही. मी माझ्या निखीलसाठी साधा बुटही घेऊ शकलो नाही, त्याला १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा ड्रेस घ्यायचा होता, पण त्याने मॅडमला सांगितले माझ्या वडिलांकडे पैसे नाहीत. एवढी दुर्दशा सहन करण्यापेक्षा मेलेलं बरं, म्हणून मी हा निर्णय घेतला.

रुपाली (पत्नी) मला माफ कर, अनुष्का आणि निखील तुम्ही तुमच्या बापाला माफ करा, तुमचा बाप अपयशी ठरला, मुलांना जीव लावा, बहीण-भाऊ मित्र मंडळी माझ्याकडून कुणाचे मन दुखावले असेल तर माफ करा”, अशा आशयाची सुसाईड नोट मिळाली आहे.