Pune Crime News | महिलेचा विनयभंग करणार्या पीएमपीतील वाहकावर गुन्हा दाखल; ‘कुसाळकर आमचा बाप आहे, तुम्ही कसा गुन्हा दाखल करता ते बघून घेतो’, म्हणत केला विनयभंग (Video)

पुणे : Pune Crime News | पुणे स्टेशन आगारातील डेपो मॅनेजरविरोधात (Pune Station Depot Manager) तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेचा “कुसाळकर आमचा बाप आहे कसा गुन्हा दाखल करता ते बघून घेतो,” असे म्हणून अश्लिल हातवारे करुन महिलेचा विनयभंग (Molestation Case) करणार्या वाहकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुनिल धोंडीभाऊ भालेकर Sunil Dondibhau Bhalekar (वय ४४, रा. चर्होली फाटा) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३३ वर्षाच्या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना शबरी हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल भालेकर हा पीएमपी मधील पुणे स्टेशन आगारामध्ये नेमणूकीला होता. फिर्यादी यांना तो ओळखतो. पुणे स्टेशन आगारामध्ये असताना त्याने फिर्यादी यांचा पाठलाग केला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध २०२३ मध्ये विनयभंगाची फिर्याद दिली होती. त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी त्याने फिर्यादी यांना मारहाण करुन शिवीगाळ करुन धमकी दिली होती. त्याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची पोलिसांनी नोंद केली होती. त्याची खातेनिहाय चौकशी होऊन त्याची न ता वाडी येथे बदली करण्यात आली.
पुणे स्टेशन येथील डेपो मॅनेजर संजय राजाराम कुसाळकर (Sanjay Rajaram Kusalkar) याच्याकडून होत असलेल्या त्रासाबाबत फिर्यादी यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. त्या २२ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात दोघाबरोबर आल्या होत्या. तेथे बराच वेळ लागल्याने त्या जेवण करण्यासाठी सोमवार पेठेतील शबरी हॉटेलमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी सुनिल भालेकर हा त्यांचा पाठलाग करत हॉटेलपर्यंत आला. फिर्यादी यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असताना त्यांच्याकडे पाहून अश्लिल हातवारे करुन “कुसाळकर आमचा बाप आहे कसा गुन्हा दाखल करता ते बघून घेतो,” असे बोलून त्यांना डोळा मारुन तेथून निघून गेला. पोलीस उपनिरीक्षक निकीता उईके तपास करीत आहेत.