Mutual Fund SIP | करोडपती बनणे इतके पण नाही अवघड, येथे गुंतवणूक केल्यास 20,000 रुपये पगारवाला व्यक्तीसुद्धा बनू शकतो कोट्यधीश!

नवी दिल्ली : Mutual Fund SIP | प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपण करोडपती व्हावे, परंतु प्रत्येक व्यक्तीसाठी इतका पैसे कमावणे शक्य नसते. जर तुम्हाला करोडपती बनायचे असेल तर, तर आवश्यक नाही की तुमचा मासिक पगार जास्त हवा. एका चांगल्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करूनसुद्धा व्यक्ती करोडपती बनू शकतो.

मात्र, यात थोडा वेळ लागतो. गुंतवणूक करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सरकारी योजना, बँक एफडी सारख्या अनेक पर्यायांचा समावेश आहे. बहुतांश लोक गुंतवणूक करण्यासाठी हेच पर्याय निवडतात, परंतु यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला जास्तीत जास्त 9 टक्के परतावा मिळू शकतो.

जर तुम्हालाही तुमचे पैसे एका अशा योजनेत गुंतवायचे असतील, जिथे तुम्ही करोडपती बनू शकता तर तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये तुमचे पैसे गुंतवू शकता. म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करून करोडपती बनण्यासाठी दिर्घकाळ नियमित प्रकारे गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये तुम्ही केवळ 250 रुपये महिनापासून सुरूवात करू शकता. यामध्ये कमी पगारवाला व्यक्तीसुद्धा गुंतवणूक करून करोडपती बनू शकतो.

जर तुमचा पगार 20,000 रुपये प्रति महिना असेल, तरीसुद्धा तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये दरमहिना थोडी-थोडी गुंतवणूक करून करोडपती बनू शकता. तुम्ही दर महिन्याला तुमच्या पगारातून 4000 रुपयांची बचत करून म्युच्युअल फंड SIP मध्ये नियमित गुंतवणूक करा. असे सातत्याने 28 वर्षापर्यंत करायचे आहे. जर तुम्हाला 12 टक्के दरानेसुद्धा परतावा मिळाला, तर तुम्हाला 28 वर्षानंतर 1,10,34,339 रुपये मिळतील. यामध्ये तुमची गुंतवणूक केवळ 13,44,000 रुपये