Kolhapur Crime News | व्याजापोटी शरीरसुखाची मागणी, महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत वारंवार बलात्कार, दारू पाजून बेशुद्ध करून फोटो-व्हिडिओ काढून बदनामीची धमकी

कोल्हापूर : Kolhapur Crime News | व्याजाने पैसे देऊन व्याजापोटी शरीरसुखाची मागणी करून वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकास अटक केली आहे. रामा विठ्ठल जानकर (वय-४६, रा. शिवप्रसाद कॉलनी, कदमवाडी, कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Kolhapur Crime News)

फिर्यादीत म्हंटले आहे की, दारू पाजून बेशुद्ध करून छायाचित्र आणि व्हिडिओ काढून बदनामी करण्याची धमकी देऊन इच्छेविरोधात शारीरिक सुख घेतले. २०१४ ते २४ दरम्यान त्याने हा गुन्हा केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. (Rape Case)

अधिक माहितीनुसार, रामा जानकर याने फिर्यादी महिलेला २०१४ मध्ये १० टक्के व्याजाने ७० हजार रुपये दिले होते. व्याज थकल्यानंतर फिर्यादी महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. दारू पाजवून बेशुद्ध अवस्थेत छायाचित्र व चित्रीकरण केले. छायाचित्रे आणि व्हिडिओ नातेवाइकांना दाखवणार, अशी धमकी दिली. तिच्यावर बळजबरी करून इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले. तसेच व्याजासाठी राहते घर तीन लाखांसाठी बळजबरीने लिहून घेतले आहे. व्याजासह मुद्दल परत दे नाही तर शारीरिक संबंध ठेव, असा तगादा लावून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जानकर हा अनधिकृत व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करतो. त्याच्याविरोधात फिर्याद दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची कोणत्याही शासकीय दफ्तरी व्याजाने पैसे देणाऱ्या सावकरांच्या यादीत नोंद नसल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलिस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील, पोलिस उपनिरीक्षक आकाश जाधव अधिक तपास करीत आहेत.