Gadchiroli Crime News | सीआरपीएफ जवानाने स्वतःच्या रायफलने गोळी झाडून संपवलं जीवन

गडचिरोली : Gadchiroli Crime News | केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानाने (CRPF Jawan) स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गिरीराज रामनरेश किशोर (वय-३०) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. दरम्यान या घटनेने कुटुंबांपासून दूर सेवा देणाऱ्या सैनिकांना येणाऱ्या मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अधिक माहितीनुसार, गिरीराज किशोर यांना आज सकाळी धानोरा पोलीस ठाण्यातील एका मोर्चात तैनात करण्यात आले होते. दरम्यान रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या रायफलने गोळी झाडून घेतली. घटनेनंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान आता त्यांनी आत्महत्या केली की चुकून गोळी लागली हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.