Bhandara Crime News | प्रसुतीकळा आल्याने रुग्णालयात दाखल केले, उपचारादरम्यान नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा गर्भातील बाळासह मृत्यू

भंडारा : Bhandara Crime News | उपचार सुरु असताना नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा गर्भातील बाळासह मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडाऱ्याच्या तुमसर येथे घडली आहे. सुनिता दुर्गेश सोयाम (वय-२४, आष्टी, ता- तुमसर ) असे मृत गर्भवती महिलेचे नाव आहे. दरम्यान उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अधिक माहितीनुसार, सुनीता हिला प्रसुतीकळा आल्याने नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेला सुरुवातीला नाकाडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम दाखल करण्यात आले होते प्रसूतीला वेळ असल्याचे सांगत डॉक्टरांनी तिला घरी परत पाठविले. घरी गेल्यानंतर अधिक त्रास जाणवू लागल्याने तिची प्रकृती खालावली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात सुनीता हिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते.
येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्यावर उपचार सुरु केले असताना तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गर्भवती महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र तपासणीअंती मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.