Surendra Pathare | वडगाव शिंदे येथील न्यू मॅाडेल हाॅस्पिटल आधुनिक सोईसुविधांयुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – सुरेंद्र पठारे

वडगाव शिंदे येथे न्यू माॅडेल हाॅस्पिटलचे भूमिपूजन दि. २२ फेब्रुवारी रोजी सुरेंद्र बापूसाहेब पठारे व आवाहन फाउंडेशन’ आणि ‘जॉन्सन कंट्रोल्स’चे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.
पुणे : Surendra Pathare | वडगावशेरी मतदारसंघातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘आवाहन फाउंडेशन’ आणि ‘जॉन्सन कंट्रोल्स’ यांच्या सहकार्याने न्यू मॉडेल हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या हॉस्पिटलच्या भूमिपूजन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून सुरेंद्र पठारे, ‘आवाहन फाउंडेशन’ आणि ‘जॉन्सन कंट्रोल्स’ यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वडगाव शिंदे गावचे सरपंच सौ. हेमलता शिंदे, उपसरपंच व नागरिक बांधव उपस्थित होते.
वडगाव शिंदे सारख्या ग्रामीण भागाला आरोग्य सुविधांनी अधिक सक्षम करण्यासाठी सरपंच सौ. हेमलता शिंदे यांनी ‘आवाहन फाउंडेशन’ आणि ‘जॉन्सन कंट्रोल्स’ यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला. हे न्यू मॉडेल हॉस्पिटल संपूर्ण अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहे व यामध्ये विविध रोगांवरील उपचार पद्धती तसेच तातडीच्या सेवा उपलब्ध असतील. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात जावे लागणार नसून नागरिकांचा वेळ व खर्च वाचेल तसेच तातडीच्या उपचारांसाठी मदत होईल. आरोग्य सुविधा गावामध्येच मिळणार असल्याने नागरिकांमध्ये आनंद तसेच समाधानाचे वातावरण आहे.
सरपंच सौ. शिंदे म्हणाले, “वडगाव शिंदे ग्रामस्थांसाठी सुसज्य हाॅस्पिटल मिळावे म्हणून मी वारंवार शासकीय स्तरावर पाठपुरावा केला होता. पंरतू काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. ‘आवाहन फाउंडेशन’ आणि ‘जॉन्सन कंट्रोल्स’ यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला. या न्यू मॉडेल हॉस्पिटलसाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. तसेच उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सेवा आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी विनंती केली आहे.”
” वडगावशेरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मूलभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे. आरोग्य व्यवस्थेचा विकास हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. न्यू मॉडेल हॉस्पिटलमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळतील, जी आजच्या काळाची गरज आहे. तसेच, वडगाव शिंदे येथील न्यू मॅाडेल हाॅस्पिटल, आधुनिक सोईसुविधांयुक्त करण्यासाठी सर्वेातपरी प्रयत्न करण्याच्या दिशेने व वडगावशेरी मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब पठारे हे सदैव तत्पर आहेतच या सामाजिक प्रकल्पांच्या माध्यमातून वडगावशेरी मतदारसंघ आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान उंचावण्याच्या दिशेने वेगाने पुढे जाईल.” असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केले.
भूमिपूजन समारंभाप्रसंगी हवेली तालुका सभापती अशोक बापू खांदवे, वडगाव शिंदे गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ हेमलता विलास शिंदे, उपसरपंच सौ शिवानी शिंदे, युवराज काकडे, सौ उषा काकडे, सौ योगिता शिंदे, सौ दिपाली शिंदे, ग्रा.वि.अधिकारी दयानंद कोळी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वैशाली मांगले, ग्रा.प.कर्मचारी इंद्रायणी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन कल्याण आबा शिंदे, भरत काकडे, पदा चव्हाण, नितीन शिंदे, राजेंद्र शिंदे, सचिन काकडे, विक्रांत गव्हाणे, जयदीप शिंदे, रामभाऊ काकडे गणेश शिंदे, विलास शिंदे, सुनील काकडे, विजय शिंदे, मच्छिंद्र शिंदे, राजेंद्र शिंदे, वैभव शिंदे, भरत काकडे, खंडू काकडे, विलास काकडे, संभाजी शिंदे, विजय साकोरे, महेंद्र काकडे, बापू काकडे, सदाशिव काकडे, भीमराव शिंदे, अरुण काकडे, धनाजी बारणे, तानाजी शिंदे, विनोद शिंदे, आवाहन फाउंडेशन’ आणि ‘जॉन्सन कंट्रोल्सचे प्रसन्न बारी, तुषार जाधव, वर्तिका जिंदल, विजय नेहरे, अमोल कुंभार, मोहम्मद जाहिद इस्लाम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.