Gaja Marne Arrested | पुणे : गुंड गजा मारणेला पोलिसांनी त्याची जागा दाखवली ! पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अतिशय कडक भूमिका घेतल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर

पुणे : Gaja Marne Arrested | कोथरुड येथील आय टी इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar IPS) यांनी अतिशय कडक भूमिका घेतल्यानंतर गजा मारणे व रुपेश मारणे यांना त्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी केले. त्यानंतर गजा मारणे हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करण्याची कारवाई सुरु केली आहे. (Gaja Marne Gang)
गजा मारणे व त्याच्या टोळीतील २७ जणांवर कारवाई करणार, त्यांची मालमत्ता जप्तीसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज वार्तालाप कार्यक्रमात दिली होती. त्यानंतर काही तासात गजा मारणे हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्याच्याविरुद्ध १९८८ पासून एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दोनदा तडीपाराची कारवाई करण्यात आली असून एकदा स्थानबद्ध केले आहे. अशा प्रकारे त्याच्यावर १२ वेळा वेगवेगळी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. (Kothrud Police)