Crime News | बाईकवरून पाठलाग करत काँग्रेस नेत्याची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ

बंगळूर : Crime News | काँग्रेस नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हैदर अली असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे. (दि.२४) ही घटना मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली. हैदर अली एका मित्रासोबत बाईकवरून लाईव्ह बँड परफॉर्मन्सवरून परतत असताना आरोपींनी त्यांचा बाईकवरून पाठलाग करत त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. (Murder Case)
घटनेची माहिती मिळताच, अशोकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अवस्थेत पडलेल्या हैदर अलीला ताबडतोब बोअरिंग रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच हैदर अली यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.