Suresh Dhas Convoy Was Stopped | मुंडे-कराड समर्थकांचा भाजपा आमदार सुरेश धस यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न, परळीत येण्यास विरोध, जोरदार घोषणाबाजी

बीड : Suresh Dhas Convoy Was Stopped | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) प्रमुख आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या समर्थकांनी आज भाजपा आमदार सुरेश धस यांचा ताफा अडवला, आणि दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार घडला नाही. धस हे मृत महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी सकाळी परळीत येत असताना हा प्रकार घडला.
भाजपा आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख खूनप्रकरणात आरोपी वाल्किम कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केले आहे. कालच त्यांनी धनंजय मुंडे यांचा कृषी आणि कृषी खात्यातील बदली घोटाळा पुराव्यानिशी समोर आणला होता. याच रागातून मुंडे-कराड समर्थकांनी आज सुरेश धस यांचा ताफा शिरसाळा येथे अडवून दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सुरेश धस यांनी आमच्या मतदार संघात येऊ नये, असे म्हणत हे विरोधक आक्रमक झाले होते. यावेळी पोलिसांनी काही मुंडे-कराड समर्थकांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर परळीत काहीकाळ तणावाचे वातावरण होते.