Pune Crime Branch News | अल्पवयीन मुलाकडून घरफोडी, वाहनचोरीचे 2 गुन्हे उघडकीस; गुन्हे शाखा युनिट 5 ची कामगिरी

पुणे : Pune Crime Branch News | गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पोलीस पथकाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून घरफोडी व वाहन चोरी असे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
युनिट ५ चे पथक हडपसर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड व अकबर शेख यांना बातमीदारांकडून बातमी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या हडपसर येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. चोरीस गेलेले ७६ हजार रुपयांचे दागिने जप्त केले. तसेच सांगवी येथून या चोरट्याने मोटारसायकल चोरली होती. ती मोटारसायकल जप्त केली आहे.
अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, अकबर शेख व उमाकांत स्वामी यांनी ही कारवाई केली.