Mumbai Crime News | अधिकाऱ्यांची वैयक्तिक माहिती मिळवायचा, सोशल मीडियावर अश्लील मजकूर, फोटो मार्क करून ब्लॅकमेल करायचा, आरोपी अटकेत

मुंबई : Mumbai Crime News | महापालिका अधिकाऱ्यांची वैयक्तिक माहिती मिळवून त्यांना बदनामीची भिती दाखवून ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. चंदन ठाकूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात बदनामीच्या ८ गुन्ह्यांसह एकूण १५ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपी चंदन ठाकूर हा वसई विरार तसेच मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकार् यांचे फोटो मार्क करून, त्यांची वैयक्तिक माहिती मिळवून, अश्लील मजकूर लिहून बदनामी करण्याच्या नावाने धमकावून ब्लॅकमेल करत होता. वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, तसेच, उपायुक्त दिपक सावंत यांची देखील सोशल मीडियावरून अश्लील मजकूर प्रसारीत करून बदनामी कऱण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. असाच प्रकार मिरा भाईंदरच्या महापालिका अधिकार्यांच्या बाबतीतही घडला होता. त्यामुळे गुन्हे शाखा ३ च्या पथकाने या प्रकऱणाचा तपास सुरू केला होता.
दरम्यान, सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने गुन्हे शाखा ३ चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांच्या पथकाने त्याचा तांत्रिक तपास केला आणि विरारच्या ग्लोबल सिटी येथून चंदन ठाकूर या आरोपीला अटक केली. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.