Dehu Road Pimpri Crime News | ‘मोक्का मे से छुट के आया हू, और तुम मुझे हात लगाओगे’’ म्हणत गुंडाने केला गोळीबार ! देहुरोड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन गुंडासह चौघांना केली अटक

पुणे : Dehu Road Pimpri Crime News | वाढदिवसांच्या कार्यक्रमानंतर गप्पा मारत बसलेल्या तरुणांना शिवीगाळ व दमदाटी केल्याने भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या तरुणांना सराईत गुंडाने सालो, मै मोक्का से छुट के आया हू और तूम मुझे हात लगाओगे, असे म्हणून घरातून बंदुक आणून पळून जाणार्या तरुणांवर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Arrest In Firing Case)
याबाबत मलिक कुमार इंद्रा (वय १८, रा. गांधीनगर, देहुरोड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साबीर समीर शेख (वय २४), फैजल खान (वय २४), जॉनी ऊर्फ साईतेजा चिंत्तामल्ला (वय २४), अभिषेक रेड्डी(वय २४, सर्व रा. देहुरोड) यांना अटक केली आहे. तसेच साकीब जिलानी, दिेशन काणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आंबेडकरनगरमधील गणपती मंदिरासमोरील रोडवर १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला होता. (Attempt To Murder)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र साई भीम रेड्डी हे त्यांच्या ओळखीचे नंदकिशोर यादव याचे घरी वाढदिवसाच्या निमित्ताने गेले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर ते मंडपाबाहेर गप्पा मारत बसेले होते. यावेळी आरोपी दोन गाड्यांवरुन आले. ते नंदकिशोर यादव यांना शिवीगाळ व दमदाटी करु लागले. हे पाहून त्यांचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी व त्यांचा मित्र साई हे मध्ये पडले. तेव्हा त्यांनी फिर्यादी व त्यांचा मित्र साई रेड्डी, राजकुमार यादव यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. साबीर शेख म्हणाला, ‘‘सालो मे मोक्का से छुट के आया हू और तुम मुझे हात लगाओंगे, तुम अब ठेहरो एक एकको मै ठोक देता हू, दिन्या सामान लेके आ,’’ अशी धमकी देऊन साबीर शेख घरातून बंदुक घेऊन आला. हे पाहून फिर्यादी व त्यांचा मित्र गाडीवरुन तेथून घाबरुन पळून जाऊ लागले. तेव्हा साबीर शेख याने हवेत गोळीबार करीत दहशत निर्माण केली. फिर्यादी व त्यांचा मित्र यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याने बंदुकीतून फिर्यादीच्या दिशेने गोळीबार केला. फिर्यादी यांनी खाली वाकून गाडीवरुन जोरात पुढे घेऊन गेले. तरी त्याने पुन्हा त्यांच्या दिशेने गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक जोहेब शेख तपास करीत आहेत.