Ratnagiri Crime News | खासगी गाडीवर चालक म्हणून गणपतीपुळ्याला गेले, जेवण करून गाडीजवळ येताच चक्कर आली, उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : Ratnagiri Crime News | गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या सांगलीतील तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. सचिन बबन कापसे (वय-३८, रा- जत, जि -सांगली) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबाने खासगी गाडीवर सचिन कापसे याला चालक म्हणून घेऊन गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आणले होते. गुरुवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास तेथील एका हॉटेलमध्ये जेवण करून सर्वजण गाडीजवळ येत असताना चालक सचिन कापसे चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी मालगुंड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मध्यरात्री अडीज वाजताच्या सुमारास चालक सचिन कापसे यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.