Pune Crime News | जुगाराच्या चिठ्ठ्या घेण्याची नवी शक्कल ! चालत चालत फोनवरून घेत होता मटक्याचे आकडे, दोघांना अटक

पुणे : Pune Crime News | जुगार अड्ड्यावर पोलीस सातत्याने धाड टाकत असल्याने जुगार अड्डा एका ठिकाणी ठेवण्याऐवजी नवी शक्कल लढविली आहे. मटका जुगाराच्या चिठ्ठ्या घेण्यासाठी पंटर एका जागी न थांबता चालत चालत मोबाईलवर कल्याण मटका घेतो. व्यंकटेश्वरा गेम पार्लरच्या नावाने मालक येथे रोकड गोळा करीत असल्याचे दिसून आले. खडक पोलिसांनी छापा घालून दोघांना पकडले. त्यांच्याकडून १ लाख ३५ हजार ३१० रुपयांची रोकड व जुगाराचे सहित्य व मोबाईल जप्त केले आहेत. (Pune Police Raid On Gambling Den)

जुगार अड्डा मालक सिद्धार्थ गणपत गोणे Siddharth Ganpat Gone (वय ३६, रा. गंज पेठ) आणि कल्याण मटका घेणारा शंकर दत्तु भिसे Shankar Dattu Bhise (वय ४२, रा. पी एम सी कॉलनी, घोरपडी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलीस अंमलदार अनिल रमेश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कांबळे, हवालदार तळेकर, साबळे, पोलीस अंमलदार पवार, चव्हाण हे १८ फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अनिल गायकवाड यांना त्यांच्या बातमीदाराने खबर दिली की, शंकर भिसे हा चालत चालत फोनवरुन चोरुन मटका घेत आहे. त्या बातमीदाराने लांबून शंकर भिसे याला दाखविले. पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केला असता तो जुगाराच्या चिठ्ठ्या घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी अचानक त्याच्यावर छापा घालून पकडले. हा मटक्याचा धंदा कोणाला आहे, असे विचारता त्याने सिद्धार्थ गोणे याचा असल्याचे सांगितले. त्याला घेऊन पोलीस गंज पेठेतील व्यंकटेश्वरा गेम पार्लर मध्ये गेले. तेथे सिद्धार्थ गोणे हा चिठ्ठ्या घेऊन पैसे मोजत असल्याचे दिसून आले. दोघांची झडती घेतली. त्यांच्याकडे मोबाईल, जुगाराचे साहित्य, रोकड असा ३५ हजार ३१० रुपयांचा ऐवज मिळाला. त्यांना खडक पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यात त्याने जुगारातून मिळालेला नफा घरात ठेवला आहे. त्या माहितीनुसार पोलिसांनी घरात झडती घेतली असता त्यांना १ लाख रुपयांचे बंडल मिळाले. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे (PSI Mahendra Kamble ) तपास करीत आहेत.