Manikrao Kokate | कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव ठाकरेंची जामीनासाठी धावाधाव, आता उच्च न्यायालयात अपिल करणार

नाशिक : Manikrao Kokate | महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव ठाकरे यांना आज नाशिक न्यायालयाने बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याच्या प्रकरणात दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावणली. या शिक्षेमुळे ठाकरे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी सुद्धा धोक्यात आली आहे. दरम्यान, या खटल्याचा निकाल लागताच ठाकरे यांनी ताबडतोब जामीनासाठी धावधाव करत अर्ज दाखल केला, यानंतर कोर्टाने पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. आता ते निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपिल करणार आहेत.
न्यायालयात उपस्थित असलेले कृषिमंत्री माणिकराव ठाकरे यांनी निकालानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. ठाकरे म्हणाले, हे प्रकरण मी कृषिमंत्री झाल्यानंतरचे नाही. 30 वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भात तक्रार केली होती.
या प्रकरणानंतर माझी आणि दिघोळे यांची चांगली मैत्री देखील झाली होती. तेव्हा मी राजकारणात नुकताच प्रवेश केला होता. आमदार होतो की नव्हतो तेही स्मरणात नाही. तो काळ आणि आजचा काळ यात फरक आहे.
पुढील काळात माजीमंत्री तुकाराम दिघोळे व माझ्यात सलोख्याचे, मैत्रीचे संबंध निर्माण झाले. परंतु, एखादे कायदेशीर प्रकरण दाखल झाल्यानंतर कायदेशीररित्या नियमानुसार प्रक्रिया पार पडते. उशिराने ही प्रक्रिया झाली आणि न्यायालयाने आज निकाल दिला. मी अद्याप निकालपत्र वाचलेले नाही, वाचले की सविस्तर प्रतिक्रिया देतो, असे कोकाटे म्हणाले.
कमी उत्पन्न दाखवून चार सदनिका लाटल्याच्या या प्रकरणात माणिकराव ठाकरे यांना कोर्टाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्याने त्यांची खासदारकी आणि आमदारकी धोक्यात आली आहे. यासाठी त्यांनी अटक टाळण्यासाठी जामीन मिळवला असून आता ते उच्च न्यायालयात अपिल दाखल करणार आहेत.
दरम्यान, माजी कृषिमंत्री आणि विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे संतोष देशमुख खूनप्रकरण आणि कृषी घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अडचणीत आले असताना आता विद्यमान कृषिमंत्र्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटल्याच्या प्रकरणात शिक्षा झाल्याने महायुती सरकारची प्रतिमा आणखी मलिन झाली आहे. आता माणिकराव ठाकरे यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधक करू शकतात.
याबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले की, न्यायालयाच्या निकालामुळे माझ्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते. परंतु, अपिलात जाण्याची तरतूद आहे. राजकीयदृष्ट्या देशात अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत. मी अपिलात जाणार आहे. न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे, तसाच मला वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे.