Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना ‘बेल्स पाल्सी’ नावाचा नवा आजार, दोन मिनिटे बोलताही येईना, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले,…

मुंबई : Dhananjay Munde | बीड मधील हत्या प्रकरणातील आरोपींशी जवळीक असल्याने मंत्री धनंजय मुंडेंवर विरोधक निशाणा साधताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या कार्यकाळात कृषी विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
https://x.com/dhananjay_munde/status/1892525419175588195?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1892525419175588195%7Ctwgr%5Edc6deab4d724f7d942482429ff459c2c4bd2558f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fpolitics%2Fdhananjay-munde-is-suffering-from-bell-s-palsy-disease-and-cannot-even-speak-for-two-consecutive-minutes-say-doctor-npc-leader-in-hospitalize-1345344
एकीकडे धनंजय मुंडेंवर आरोपांची मालिका सुरू असतानाच त्यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आराम घेत आहेत. दरम्यान, डोळ्याच्या आजारातून बाहेर येत नाहीत, तोपर्यंत आता धनंजय मुंडेंना एका नव्या आजाराने ग्रासले आहे. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी ( Bell’s Palsy) हा आजार झाला असून त्यांना दोन मिनिटेही नीट बोलता येत नाही, अशी माहिती त्यांनी स्वत:च समाज माध्यमावर पोस्ट करत दिली आहे.
‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी म्हंटले आहे की, ” माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.
त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही.
याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल…”, अशी पोस्ट मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
‘बेल्स पाल्सी’ ही एक मेंदूशी संबंधित म्हणजेच न्यूरोलॉजिकल समस्या आहे, ज्यामध्ये चेहऱ्याची नस (फेशियल नर्व) कमजोर होते किंवा प्रभावित होते, त्यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होते.